तुळजापूर,  दि. २२: 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे मंजूर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामास त्वरित सुरुवात करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) तुळजापूर तालुकाच्या वतीने लेखी निवदनाद्वारे  तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. 
 
तुळजापूर  तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा सचिव एस.के.गायाकवाड , तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल जेटीथोर,जेष्ठ कार्यकर्ते नाशिक कांबळे आदीसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top