वागदरी, दि.१६: 
एस.के.गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रा.प.चे नूतन सरपंच अशोक पाटील यांचा वागदरी येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील सह ग्रामस्थानी यथोचित सत्कार केला.

   तुळजापूर तालुक्यात नुकतच पहिल्या टप्प्यात झालेल्या ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत जळकोट ग्रापंचायतीची निवडणूक झाली. या निडनूकित महाविकास आघाडी पँनला स्पष्ट बहुमत मिळाले असून राष्ट्रीय काँग्रेसचे आशोक पाटील यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे.

   आशोक पाटील यांची तुळजापूर तालुक्यातील  जळकोट ग्रा. प.च्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल वागदरी, ता.तुळजापूर येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील सह ग्रामस्थानी शाल,फेटा, पुष्पहार, पुष्क गुच्छ देवून यथोचित सत्कार केला. 

यावेळी शंकर धुमाळ,माजी उपसरपंच दत्ता आण्णा सुरवसे, रामसिंग परिहार,नामदेव यादव,किशोर धुमाळ, कृष्णात मोरे आदी उपस्थित होते.
 
Top