हन्नुर दि. १७ : नागराज गाढवे
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संगीता बसवंत औरसंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच आमोगसिदध खांडेकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी उपसरपंच पदासाठी संगीता बसवंत औरसंगे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले म्हणून संगीता औरसंगे यांची बिनविरोध निवड झाली. बोरेगाव ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच उपसरपंच पदी महिलेची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच उमाकांत गाडवे ग्रामपंचायत सदस्य अमोगसिदध खांडेकर , दुल्हेसाब हवालदार, अक्षय माने ,ललिता जडगे, लक्ष्मण औरसंगे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक नागनाथ सोरेगाव यांनी काम पाहिले. निवडीनंतर नुतन उपसरपंच संगिता औरसंगे यांचा सरपंच उमाकांत गाडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर ग्रामस्थांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून जल्लोष केला.