अणदुर,दि.१८
तुळजापूर तालुक्यातील "अणदूर " या गावाला फार मोठा आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय, वारसा असून येथील जनता ही हुशार, चाणाक्ष आहे, गावचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य हे उच्च शिक्षित, आहेत त्या मुळे पुढील काळात गावचा विकास निश्चित होईल, असे उदगार ह. भ. प. गहनिनाथ महाराज औसेकर यांनी काढले.
औसेकर महाराज हे जवाहर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अणदूर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य बाबुराव चव्हाण हे होते ,पुढे बोलताना औसेकर महाराज म्हणाले की शिक्षण महर्षी आलूरे गुरुजी व माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विकासात्मक पावलावर पाऊल ठेऊन नवीन सरपंच, सदस्यांनी या गावाचा विकास करावा अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली.
कार्यक्रमात नूतन सरपंच रामचंद्र आलूरे, जि. प. सदस्य बाबुराव चव्हाण यांचीही भाषणे झाली, या वेळी नूतन सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, सदस्य डॉ जितेंद्र कानडे, धनराज मुळे, बाळकृष्ण घोडके, डॉ विवेक बिराजदार, बालाजी घुगे,गणेश सूर्यवंशी, सरिता मोकाशे, अनुसया कांबळे, उज्वला बंदपट्टे, स्नेहा मुळे, गोदावरी गुड्डू, जयश्री व्हटकर, देवकी चौधरी, अनिता घुगरे,मोतनबी इनामदार आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एम. बी. बिराजदार यांनी केले.
कार्यक्रमास जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.