तुळजापूर, दि. १८ :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघाने सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक श्री शिव छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 31 हजार, द्वितीय पारितोषिक 21 हजार, तृतीय पारितोषिक 11 हजार, चौथे पारितोषक 7 हजार, पाचवे पारितोषिक 5 हजार रुपये असून याचबरोबर सर्वोत्कृष्ट कामगिरी व खेळ करणाऱ्यासाठी प्रावीन्य बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत. ही स्पर्धा आरळी बुद्रुक येथे खेळवली जाणार असून प्रवेशाची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे.
या स्पर्धा 21 फेब्रुवारी रोजी तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश संभाजी पारवे, तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे,ह.भ.प.कल्याण महाराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास क्रिडाप्रेमी नागरिकानी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.