नळदुर्ग, दि. 20 : पोखरा अंतर्गत निवड झालेल्या राज्यातील गावात यापूढे गावसभा होणार असून शेत-यांना डिजीटल साक्षरता अभिनातंर्गत प्रत्येक महिन्यातील मंगळवारी कृषी ताई मार्फत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेती व्यवसायास चालना मिळणार असून शेतक-यांनी जास्तीत जास्त संख्येनी या उपक्रमात सहभागी होण्याचे अवाहन उपसंचालक सुनिल कोळेकर यांनी केल्याचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई याच्या संयुक्त विद्यमाने शेतक-याकरिता दि. 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन विषयी तांत्रिक प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी सुनिले कोळेकर हे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी होर्टी ता. तुळजापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले यांनी पोखराचे उपसंचालक सुनिल कोळेकर यांचे स्वागत केले. तर संचालक डॉ. भास्कर पाटील यांचे स्वागत जवळगा ता. तुळजापूर येथील माजी सरपंच दादासाहेब चौधरी यांनी केले. या प्रशिक्षण दरम्यान सुनिल कोळेकर डॉ. भास्कर पाटील रमेश घुले, विश्वास जाधव, संजय पारडे, राजेश नाकाडे, यांनी उपस्थित शेतक-यांना सविसतर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी उस्मानाबाद जिल्ह्रयातील 65 शेतकरी सहभागी झाले होते. तुळजापूर तालुक्यातील होर्टी योथील संतोष मोरे, बाळासाहेब गुंजोटे, ईटकळ, मानमोडीचे दत्ता गायकवाड, जवळगा मेसाई, यासह इतर गावातील शेतकरी सहभागी होते.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सहभागी झालेल्या शेतक-यांना प्रमाणपत्र देण्यात आले.दरम्यान उस्मानाबाद जिल्हयातील तावरखेडा या गावातील १४ शेतकरी सहभागी झाले होते.