मुरूम दि. ११, काका चषक संयोजकाच्या वतीने मातोश्री कै. गंगादेवी माधवराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पित करुन सामन्याच्या दुसऱ्या चरणास प्रारंभ करण्यात आले. 

 माजी  राज्यमंत्री बसवराज पाटील व  मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती बापूराव  पाटील यांच्या  मातोश्री व जिल्हा परिषद उस्मानाबाद विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांच्या आजी यांचे दि. ०४ फेब्रुवारी रोजी  निधन झाले होते. त्यांच्या निधनाने  सर्वञ शोककळा पसरली होती.

शहरात शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यापासून मुरूम शहरातील नगर परिषद मैदानात काका चषक २०२१ भव्य खुल्या टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेटचे सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, मातोश्री यांच्या दुःखद निधनाने आयोजकांनी सामने थांबवले होते.

दि. १० रोजी आयोजकांच्या वतीने मातोश्री कै. गंगादेवी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व तसेच दोन मिनिटे मौन पाळून, श्रद्धांजली वाहण्यात आली. व तसेच दुखवटा मुळे थांबलेल्या सामान्यास आज पासून  प्रारंभ झाले आहे.

यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, शरण पाटील मित्र मंडळ अध्यक्ष राजू मुल्ला, आयोजक किरण गायकवाड, देवराज संगुळगे, सूरज कांबळे, गुलाब अडके, बसवराज आडके, उत्कर्ष गायकवाड, श्रीहरी पाटील, शिवा दुर्गे, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे व खेळाडू आदी उपस्थित होते.
 
Top