उस्मानाबाद,दि.22
  सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना नियंत्रणासाठी ग्राम पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात ग्रामसेवकांचे योगदान  अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. विजयकुमार फड यांनी  ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावयाचे उपाययोजना, सुंदर माझे कार्यालय अंतर्गत परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, क्षेञीय कर्मचाऱ्यांचे काम याबाबत पंचायत समिती भूम येथे सविस्तर आढावा घेण्यात आला.    

  कोरोनाचा शिरकाव उस्मानाबादमध्ये वाढत असून त्यात ग्रामपातळीवर कडक उपाययोजना कराव्यात, त्यात मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व अनावश्यक गर्दी टाळणे,तसेच सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करणे बाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच कोरोणा रुग्ण निघाल्यास आवश्यकतेनुसार आजूबाजूचा परिसर हा सँनेटाईज करणेची कार्यवाही करावी.

तसेच बैठकीनंतर डॉ.फड यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन शाळा,वृक्षलागवड व इतर कामांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
                                        
 
Top