जळकोट,दि.२२:  
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संचालक, तुळजापूर तालुका खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष महेश बंकटराव कदम यांची उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल जळकोट येथील ग्रामपंचायत सदस्य संजय माने व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य सय्यद तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, ग्रामपंचायत सदस्य सलीम जमादार, अनिल छत्रे, इरण्णा स्वने,मेघराज किलजे,नागनाथ किलजे, दगडू हासुरे, चंद्रकांत सोनटक्के आदीसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top