उस्मानाबाद.दि.२२
बस थांब्यावर रस्त्याच्या  कडेला  दुचाकीसह थांबलेल्या दोघाना अज्ञात ट्रॕक्टरच्या चालकाने धडक देवुन झालेल्या आपघातात एक  ठार तर एक जखमी झाल्याची घटना सारोळा ता.उस्मानाबाद येथे घडली आहे.

 
तालुक्यातील सारोळा येथील बस थांब्याजवळ अण्णासाहेब दयानंद शिंदे वय 42 वर्षे व गणेश बंकट शिंदे राहणार टाका.ता.औसा हे दोघे १९ फेब्रुवारी रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास येथील बस थांब्याजवळ रस्त्याच्या कडेला मोटरसायकलसह थांबले होते .

 यावेळी यज्ञात चालकाने महिंद्रा ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून दोघांना धडक दिली, या अपघातात अण्णासाहेब शिंदे मयत झाले तर गणेश शिंदे गंभीर जखमी झाले, या अपघातानंतर ट्रॅक्टरच्या अज्ञात चालक मालकांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पोलीस ठाण्यात अपघातातील ट्रॅक्टरच्या ऐवजी दुसराच ट्रॅक्टर आणून लावला अशा मजकुराच्या मयताचे  भाऊ अजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

 
 
Top