उस्मानाबाद,दि.१३
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने रविवारी दि, 14 फेब्रुवारी रोजी बिव्हिजि ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. बिव्हिजि ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांचे ’रोजगाराच्या संधी आणि आव्हान’ या विषयावर व्याख्यान होईल.
कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांनी केले आहे.