हगलूर,दि.१३
 येथे स्वच्छता  अभियानाला धुमधडाक्यात सुरुवात करण्यात आली असुन ग्रामस्थाकडुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार रोजी गावातील मंदिर , शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

 
"माझा गाव, सुंदर गाव स्वच्छ" गाव या संकल्पनेंतर्गत  हगलूर ता.तुळजापूर येथे शुक्रवारी सदर अभियानाचे उदघाटन सरपंच अॕड  जयपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असुन दुस-या दिवशी शनिवारी ग्रामस्थ या आभियानात उत्सर्फुतपणे सहभागी झाले.


जि.प.उस्मानाबाद अंतर्गत जिल्हाभर चालू असलेल्या "माझा गाव सुंदर गाव" या आभियानाला प्रतिसाद देत हगलूर येथे हनुमान मंदिर शेजारील संपूर्ण कचरा काढण्यात आला तसेच शाळेच्या आवारातील परिसर स्वच्छ करण्यात आला आहे   सरपंच  जयपाल पाटील, उपसरपंच महेश गवळी, नालंदा पाटील, देविदास घुगे, संपत घुगे,दिनकर घुगे, मुबारक सय्यद, जयकुमार घुगे, खामदेव घुगे, प्रभाकर कांबळे, दत्ता घुगे, उपिन पाटील, नितीन घुगे, ग्रामसेवक ए एम कदम, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top