अचलेर, दि.१३,जय गायकवाड
दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता २ री वर्गाच्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च (एम.टी.एस.)परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन
या परीक्षेत लोहारा तालुक्यातील अचलेर येथील व लोटस पोतदार स्कूल उमरगा या शाळेचा विद्यार्थी श्लोक महेश खंडाळकर याने ३०० गुणापैकी २६२ गुण प्राप्त करून उमरगा तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल श्लोक खंडाळकर, त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक,व आई वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.