मुरुम, दि.१३, 
सुंदरवाडी, ता. उमरगा येथील सुंदरवाडी मोड येथील नुतन वसाहतीमध्ये १०० वृक्ष लागवडीचे वृक्षारोपन गुरुवारी (ता.११) रोजी सायंकाळी करण्यात आले.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते युसुब मुल्ला, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, जिल्हा सचिव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, उपसरपंच प्रदिप जाधव, अँड.अरूण हेडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गावंडे, गौस शेख गुत्तेदार, आयुब चाऊस, मुस्तफा शेख,  प्रा.शरद गायकवाड, दाळिंब केंद्राचे केंद्र प्रेमुख पाशा कोकळगावे,  आदींसह गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. 

यावेळी सर्व मान्यवरांचे क्लासिक डेव्हलपर्सचे  प्रमुख असलम सय्यद यांनी आभार मानले.
 
Top