जळकोट,दि.२५
आमदार रोहित पवार विचार मंचचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा नूतन राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान सेलचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  ऍड. अमोल पाटील यांनी जळकोट गावाला भेट दिली.


ॲड. अमोल पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल जळकोट येथील राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

या सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असून, या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी ब्रह्मानंद कदम, ॲड. सचिन कदम, दगडू सुरवसे, रोहित कदम, अंगद पाटील, अजय गंगणे, गणू गंगणे, विशाल कदम, तानाजी चव्हाण, करण भोगे, अमीर पाशा जमादार आदिसह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top