अणदुर,दि.२५:
तुळजापूर तालुक्यातील "अणदूरच्या सरपंचपदी रामचंद्र आलूरे यांच्या निवडीमुळे ग्रामस्थांच्या गावच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निस्वार्थी, प्रामाणिक, दूरदृष्टी, सगळ्यांना विश्वासात घेऊन ,स्वच्छ,पारदर्शक कारभार नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी करावा" असे आवाहन जेष्ठ समाजसेवक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी केले.
खुदावाडी ग्रामस्थांच्या वतीने अणदूर ग्रामपंचायतचे नूतन सरपंच, उपसरपंच ,सदस्य यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून खजुरे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुदावाडीचे सरपंच शरद नरवडे हे होते. या वेळी गावचे उपसरपंच पांडू बोगरगे हे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. खजुरे म्हणाले की ,विरोधकांचा सन्मान करा, सहकाऱ्यांना बरोबर घ्या, समाजाच्या नेमक्या अडचणी समजून घ्या, शासकीय योजनेचा अभ्यास करा, प्रगतशील गावांना भेटी देऊन त्यांनी कसा गावाचा विकास केला. त्याचा अभ्यास करा, ठोस निर्णय, अंमलबजावणी करा, जनतेचा विश्वास संपादन करा, मग बघा कसा गावाचा सर्वांगीण विकास निश्चित होतो ते,
यावेळी सत्कारमूर्ती माजी सरपंच सरिता मोकाशे म्हणाल्या की , खुदावाडी गावाने फार मोठा विकास डॉ. खजुरेंच्या नेतृत्वाखाली केला असून इतर गावांना भेटी देण्याऐवजी खुदावाडीला आम्ही सर्व सदस्य भेट देऊन व तुमचे मार्गदर्शन घेऊ असे सांगितले,
संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच रामचंद्र आलूरे, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, बाळकृष्ण घोडके यांची भाषणे झाली, या वेळी डॉ. जितेंद्र कानडे, धनराज मुळे, डॉ विवेक बिराजदार, उज्वला बंदपट्टे, स्नेहा मुळे, भागीरथी गुड्ड व इतर सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला . बाबुराव जवळगे यांनी सूत्रसंचालन व आभार केले. कार्यक्रमास वसंत चिंचोले, दगडू सालेगावे, सर्जेराव जवळगे, तुकाराम बोगरगे,गोटू नरवडे, राम जवळगे, संजय नरवडे, भास्कर व्हलदुरे आदी मान्यवरांसह महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. कोविड नियम व अटी पाळून सदरील कार्यक्रम घेण्यात आला.