अचलेर ,दि.२५ : जय गायकवाड
उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथे युवा नेते सतीश सोमवंशी व मित्र परिवाराच्या वतीने विद्या विकास हायस्कूल मधील शालेय विद्यार्थ्यांना मास्क चे वाटप करण्यात आले.
कोरोना या रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक भास्कर बेंडगे,लोहारा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे,अचलेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हिराकांत सोलंकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश खंडाळकर, सतीश सोमवंशी सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पुजारी,सुनील मदने,दत्तू धनशेट्टी,अतुल सोमवंशी,बंडूसिंह बायस,शिवसेना अचलेर शाखा अध्यक्ष सुधीर बंडगर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोहारा तालुका अध्यक्ष नितीन गोपणे,पत्रकार जय गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर विभुते तर आभार फारुक जमादार यांनी मानले.