तुळजापूर : सतीश महामुनी
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविक भक्तांनी मास्क न घातल्याबद्दल मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू करण्यात आले यामुळे अनेक भाविकांची पंचाईत झाल्याचे चित्र दिवसभर मंदिर परिसरात दिसून आले.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर यांच्याकडून सोशल डिस्टन्स आणि मास्क तुळजाभवानी मंदिर परिसर आणि शहरांमध्ये बंधनकारक करण्यात आली आहे याविषयी मंदिर संस्थान नाही या प्रसिद्धी करण करून सर्वांनी मास्क घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश करू नये असा नियम केला आहे या नियमाला अपवाद असणाऱ्या भाविक भक्तांना तसेच पुजारी आणि व्यापारी यांना या अनुषंगाने दिवसभर चौकशी करून मास्क नसणाऱ्या भाविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली याविषयी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे मंदिर संस्थानचे अध्यक्ष असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थान परिसरात खळबळ उडाली असून गेल्या चार-पाच दिवसांपासून मंदिर संस्थांकडून सातत्याने मास्क आणि सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे याला अपवाद ठरणार या सर्व घटकावर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिलेला आहे.