नळदुर्ग ,दि.१५:  
 नळदुर्ग येथे वसंतराव नाईक चौकात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रथमतः सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडा वंदन करण्यांत आले. कोरोनाच संकट असल्याने  रॅली न काढता मोठे कार्यक्रम रद्द करून साध्या पध्दतीने  जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण,हरिष जाधव , वैभव जाधव, शिवाजी चव्हाण, वसंत पवार, विलास राठोड, सुर्यकांत राठोड, बालाजी राठोड, संतोष चव्हाण, श्रीमंत चव्हाण, दत्ता राठोड, रवि राठोड, कैलास चव्हाण, एम.पी.राठोड , राजू चव्हाण, लखण चव्हाण , कुमार राठोड, सतिश राठोड, श्रीमंत राठोड, विशाल जाधव, पिंटू जाधव यांच्यासह युवक बंजारा बांधव उपस्थित होते.
 
Top