तुळजापूर,दि.१५, 
यशहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एम.मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.महाराष्ट्राची जडणघडण ही खऱ्या अर्थाने संतांच्या विचारांच्या आधारावरच झाली. व्यापारानिमित्ताने संत सेवालाल महाराजांनी भारत भ्रमंती केली. या प्रवासात त्यांनी संतांचा अभ्यास केला.त्यांची विचारधारा ही  भगवान महावीर,संत कबीर,संत तुकाराम महाराज,संत बसवेश्वर यांच्या विचाराने प्रभावित झालेली दिसुन येते
 म्हणूनच त्यांनी वैश्विक समाजाला सत्याचे आचरण करण्याची शिकवण दिली.स्वत:च्या कार्य कतृत्वावर विश्र्वास ठेवण्याची शिकवण समाजाला दिली.


याप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा डॉ एस.एम देशमुख, प्रा.डॉ.मेजर वाय.ए.डोके ,रासेयो विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा.आशपाक आतार, प्रा.डॉ.बालाजी गुंड तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.

सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
 
Top