काटी ,दि.१५उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 14 रोजी सायंकाळी येथील मुख्य दत्त चौकात  श्रीराम मंदीर निर्माण अयोध्या निधी संकलन अभियान अंतर्गत संस्कार भारती उस्मानाबाद  द्वारा कवि ग.दि. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके यांचे गीतरामायण सादरकर्ते प्रसन्न कुमार कोंडो यांच्या 11व्या पुष्पाचे गायन स्वरूपी रामायनाचे  आयोजन करण्यात आले होते. 

प्रारंभी सरस्वती प्रतिमेचे पुजन सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सतिश देशमुख, व्यवसायिक विद्यासागर ढगे, अतुल सराफ, अविनाश वाडकर , सुहास सांळुके, जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ , अध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी , ज्ञानेश्वर गुरव,अनिल बनसोडे , प्रकाश गावडे ,काकासाहेब रोडे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात सादरकर्ते प्रसन्नकुमार कोंडो यांनी "स्वयें श्रीराम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती" या गिताने करण्यात आली. गीतकार प्रसन्नकुमार कोंडो यांना पेटीवादक प्रा.अशोक कुलकर्णी, तबलावादक अण्णा वडगावकर, टाळवादक सुरेश वाघमारे सुंभेकर ,शेषनाथ वाघ, साथसंगत शरद वडगावकर, श्यामसुंदर भन्साळी,सुधीर पवार, नितीन भन्साळी यांनी उत्कृष्टपणे साथ दिली. गीतकार प्रसन्नकुमार कोंडो यांनी या बहारदार गीत रामायण कार्यक्रमात सुधीर फडके यांची श्रोत्यांना आठवण करून देत कुश लव रामायण गाती, स्वयंवर झाले . सीतेचे,सेतू बांधा रे सागरी अशा विविध गीतांची मेजवानी देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. शेवटी
गा बाळांनो श्रीरामायण या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 या  कार्यक्रमास सरपंच आदेश कोळी,  प्रमोद कुलकर्णी धामणगावकर,  माजी व्हाईस चेअरमन अतुल सराफ, विद्यासागर ढगे, सुहास साळुंके, अविनाश वाडकर, ज्ञानेश्वर गुरव, अनिल बनसोडे, काकासाहेब रोडे आदीसह भजनी मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते. 

  
 
Top