तुळजापूर, दि. १८
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सपत्नीक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले तुळजाभवानी मंदिर कार्यालयात त्यांचा महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ शामल पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सपत्नीक तुळजाभवानी देवीची पूजा केली आणि झाल्यानंतर त्यांना देवीचे पुजारी सुधीर कदम व राम छत्रे आशीर्वाद दिला. याप्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, शहर प्रमुख सुधीर कदम, महिला आघाडी प्रमुख सौ शामल पवार , युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, प्रमुख सागर इंगळे, कमलाकर चव्हाण यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते