काटी,दि.१७:उमाजी गायकवाड ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2020 पासून ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्कारास सुरुवात केली. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागा अंतर्गत दिला जाणारा सन 2019-20 या वर्षाचा जिल्हास्तरीय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत पटकाविला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. 16 रोजी उस्मानाबाद येथे जिल्हा नियोजन समिती (मध्यवर्ती इमारत) सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
काटी ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय प्रथम दहा लाखांचे तर जिल्हास्तरावरील लोहारा तालुक्यातील जेवळी व काटी ग्रामपंचायतीस विभागून प्रत्येकी 20 लाखांचे प्रथम पुरस्कार मिळवला आहे. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळविल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते
सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमच्या प्रतिनिधी बोलताना सरपंच आदेश कोळी यांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचे फळ मिळाल्याचे सांगून जिल्हा पातळीवरील पुरस्काराने समाधानी न राहता राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगून पुरस्कार प्राप्त निधीतुन व शासकीय योजनांच्या निधीचा पुरेपूर वापर करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावचा विकास साधण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच सुजित हंगरगेकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,पं.स. सदस्य रामहरी थोरबोले, अतुल सराफ,करीम बेग ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, सुहास साळुंके, हेरार काझी, अनिल बनसोडे,अविनाश वाडकर,भैरी काळे, नामदेव काळे, सतिश देशमुख, शिवलिंग घाणे,राजु वाडकर,संजय महापुरे,संजोगता महापुरे, प्रज्ञा साळुंके, भामाबाई घाणे, ज्योती कांबळे, मैनाबाई काळे, हाजीबेगम काझी, ग्रा.पं. कर्मचारी प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले विलास सपकाळ, अनिल बनसोडे, सविता बनसोडे, पोपट बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.