तुळजापूर : सतीश महामुनी
तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराज प्रांगणामध्ये तुळजापूर शहरातील महिलासाठी उस्मानाबाद माजी उपाध्यक्ष सौ अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी-कुंकवाचा समारंभ साजरा करण्यात आला
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व उस्मानाबाद जि प माजी उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई पाटील यांच्या वतीने तूळजापूर येथे हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला.यानिमित्ताने विशेष महिला लकी ड्रॉ चा आगळा-वेगळा कार्यक्रम नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक विनोद गंगणे यांच्या वतीने सपन्न झाला.
याप्रसंगी जि.प.अध्यक्षा सौ अस्मिता कांबळे, सौ.पल्लवी सचिन रोचकरी, सौ.अर्चना विनोद गंगणे,सौ. अॅड.क्रांती थिटे,सौ.अश्विनी विशाल रोचकरी,सौ.जयश्री विजय कंदले,सौ.हेमाताई औदुंबर कदम,सौ.उर्मिला पंडितराव जगदाळे,सौ.मंजूषा देशमाने,सौ.शारदा माऊली भोसले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक नेते आनंद कंदले, बापूसाहेब कणे,विशाल रोचकरी,औदुंबर कदम यांनी सहकार्य केले. मोठ्या संख्येने महिलांची यानिमित्ताने उपस्थिती होती