नळदुर्ग,दि.१७ : राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ आधिका-याच्या गलथान कारभाराने कळस गाठले असुन यांचा नाहकच ञास शालेय विद्यार्थी यांना सहन करावा लागला. मंगळवारी नळदुर्ग एस.टी.बसस्थानकातुन ग्रामीण भागत धाववणारी बस तब्बल ५ ते ६ तास न अल्याने विद्यार्थी व प्रवाशाना राञी उशिरापर्यंत ताटकळत वाट पाहावी लागली तर याप्रकरणी पालकातुन तीव्र संताप व्यक्त केले जात आहे.
दररोज दुपारी ३ वाजता सुटणारी तुळजापूर नळदुर्ग मार्गे सिंदगाव व पुढे कुंन्सावळी एस. टी. बस मंगळवार दि.१६ रोजी रात्री साडे आठ पर्यंतही नळदुर्ग बस्थानकात आल्याने सकाळी सहाला घर सोडलेले महाविद्यालयीन ४० विद्यार्थिनी तसेच प्रवाशी ताटकळत बसले होते, डेपोत डिझेल व वाहक उपलब्ध नसल्याने उशीर झाल्याची माहिती तुळजापूर विभाग नियंत्रक यांच्याकडून देण्यात आली,आपली मुलगी परतली नसल्याने मात्र पालक चिंताचूर होते.
तुळजापूर आगाराची नळदुर्ग मार्गे कुंन्सावळी, सिंदगाव, बोळेगाव पर्यंत दररोज सकाळी सहाला निघून नळदुर्ग येथे सव्वा सात ला पोहोचते या बसमधुन बालाघाटत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ४० ते ५० विद्यार्थिनी नळदुर्गला येतात व महाविद्यालय सुटल्यानंतर ते ३ वाजण्याच्या बसने आपले गाव गाठतात, मात्र तुळजापूर आगाराच्या भोंगळ कारभारामुळे तीन वाजता असणारी बस रात्री साडे आठ पर्यंत आली नव्हती.
यामुळे सहाला घर सोडलेल्या विद्यार्थिनी सहा तास ताटकळून गेल्या, सकाळी घर सोडलेल्या आपली मुलगी रात्री नऊ पर्यंत परत न आल्यामुळे पालक चिंताचूर झाले होते, आपली मुलगी अद्याप परतली नसल्याने अनेक पालक महाविद्यालय व नळदुर्ग वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधत होते,
सायंकाळी पोलीस कर्मचारी व महाविद्यालयातील शिक्षकांना वार्ता कळताच त्यांनी बस्थानकाकडे धाव घेतली व मुलींना धीर दिला.
नळदुर्ग बस्थानकात महाविद्यालय सुटण्याचा वेळी टवाळखोरांची गर्दी होते, यापूर्वी अनेक वेळा छेडछाडीचे प्रकार उघडकीस आलेले आहेत, बस्थानकात कायमस्वरूपी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी झाली असली तरी ती पूर्ण झालेली नाही, शासनाने मुलीमध्ये साक्षरतेचा टक्का वाढावा यासाठी बेटी बचाओ बेटी बढाओ चा नारा दिला आहे, मात्र तुळजापूर विभाग एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभाराने मुलींना बस्थानाकात तब्बल सहा तास तटकळत थांबावे लागले. यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे, डेपोतून बस साडे आठ पर्यंत आली नसली तरी बालाघाट महाविद्यालय प्रशासनानेही याची दखल घेऊन काही विशेष हालचाली केली नाही, महाविद्यालयाने खासगी गाडीची व्यवस्था केली नाही.
पावणे नऊ ला आली एसटी -
नळदुर्ग वाहतूक नियंत्रक महेश डुकरे यांनी तुळजापूर डेपोला वारंवार कल्पना देऊनही तीनला येणारी एसटी डिझेल व वाहक उपलब्ध नसल्याचे कारण समोर करीत सहा तास उशिराने पाठविली, शेवटी नळदुर्ग बस्थानाकात येऊन मुलीना घेऊन पावणे नऊ वाजता बोळेगाव, कुंन्सावळीकडे निघाली, या गैरसोयी मुळे मुलींना नाहकच मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी गैरसोयी करणा-या संबधित कर्मचाऱ्यांची चौकशी दोषी आढळणा-याविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.