काटी,दि.१८:   धोत्री ता.तुळजापूर येथे  शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने बुधवारी माता रमाई आंबेडकर यांच्या 123 व्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

 मान्यवरांच्या उपस्थितीत   माता रमाई आंबेडकर भवनाचा नामकरण सोहळा व  तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचा अनावरण सोहळा थाटात पार पडला. 

 याप्रसंगी बोलताना बॅंक ऑफ महाराष्ट्र तामलवाडीचे शाखाधिकारी अभिषेक कुमार म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पृश्य, अस्पृश्य, गोरगरीब, स्त्रिया, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी या सर्वांना डॉ.बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यास, संघर्ष व त्यागातून त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा, व संघर्ष  करा हा महत्वपूर्ण संदेश  प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज असून 
 विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर देऊन शिक्षण घेण्याचे आवाहन करून शिक्षणातील अडचणी वेळी आपण निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन  दिले. 

 तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत मरोड यांनी येथील ग्रामसेवक भिमराव झाडे यांनी  रमाई घरकुल योजने अंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक करुन काही वंचित लोक असतील तर त्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ निश्चित मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमासाठी तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, समाज कल्याण अधिकारी चौगुले, पंचायत समिती सदस्य शिवाजी साठे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी अभिषेक कुमार, सरपंच अश्विनी साठे,  ग्रामसेवक भिमराव झाडे, शांती दुत तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्ता उबाळे, उपाध्यक्ष सुरज मस्के, सामाजिक कार्यकर्ते राम मस्के,सादेव मस्के, योगिराज मस्के, दत्ता मस्के, किशोर उबाळे, गौतम मस्के, जी.एम.वाघमारे, राहुल मस्के, रामा उबाळे, लक्ष्मण मस्के, बाळु मस्के, समीर मस्के, श्रीराम गायकवाड, प्रविण मस्के, निलेश मस्के, सुजित गायकवाड, नागनाथ मस्के,गुणू मस्के,अर्जून मस्के, नितीन मस्के आदी मान्यवर उपस्थित होती.
 
Top