वागदरी,दि.१८: एस.के.गायकवाड महाराष्ट्र शासनाच्या जलस्वराज्य प्रकल्पाचा अभ्यास केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील पाटील तांडा (खुदावाडी) येथील ग्रामस्थानी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांना विविध मागण्याचे निवेदन दिले आहेत .
निवेदनात म्हटले आहे की , यशवंतराव चव्हाण विमुक्त जाती भटक्या जमाती मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजुर घरकुल योजनेचे काम सुरु करावेत , पाटील तांडा ते नळदुर्ग अक्कलकोट रोड वरील नाईक नगर बस थांबा पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत . येथील ग्रामस्थांना आपले दैनंदिन कामकाज व आठवडी बाजार करण्याकरिता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नळदुर्गला ये जा करावी लागते . या रोड वरून दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते तरी संबंधितानी याकडे लक्ष घालून येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे तर घरकुल योजने करिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी मेघराज पवार यांच्याकडे विविध मागणीचे निवेदन दिले आहेत .
याप्रसंगी गोर आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार , ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार , ताराबाई पवार , संजय राठोड , हरी पवार , आनिल फुलचंद पवार , गुरुनाथ राठोड , मंगल पवार, कस्तुरा राठोड उपस्थित होते.