रुईभर, दि. 20 : छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यकारभार करुन जगाला दिशा देण्याचे काम केले. तसेच काम आपण देखील करुन व ग्रामपंचायतचा कारभार जिल्हयात आदर्श करा असे मत भाजप किसान मोर्चा पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी गौडगाव ता.जि. उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत पदाधिकायांच्या पदग्रहण समारंभात बोलताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा भोसले होत्या.
कोळगे पुढे बोलताना म्हणाले की, अलीकडील काळात ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात अधिकार आलेले आहेत. सरकारच्या सर्व योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहचवून त्या कुटुंबांना न्याय देण्याचे काम करावे , विकास कामामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणले जाऊ नये , त्याचबरोबर सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन काम केले तर गावचा विकास निश्चितच होतो असेही त्यांनी शेवटी सांगितले . यावेळी बालाजी भोसले, ग्रामसेवक व्यंकट सुरवसे यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी उपसरपंच बाबा पटेल, ग्रा.प.सदस्य सौ. मनिषा माळी, सौ. मिरा ढेरे, मनोज माळी, गावातील कार्यकर्ते दादा पटाडे, भिमराव भोसले, संपत भोसले, पांडूरंग ढेरे, तानाजी भोसले, आरोग्य सेवक डॉ.कुंभार आरोग्य कर्मचारी शेख, आशा कार्यकर्ती निलोफर पठाण, जगन्नाथ भोसले, शहाजान पटेल, अशोक भोसले, रुईभरचे किशोर कोळगे, आदीसह महिला, युवक, नागरिक उपस्थित होते.
ग्रामपंचायतचा कारभार पाहाण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवस निवडला, त्याबद्दल कोळगे यांनी पदाधिकायांचे कौतुक केले. यावेळी सुत्रसंचालन बालाजी भोसले यांनी केले.