येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता १२ वी कला शाखेत शिकणारी विद्यार्थीनी कुमारी सोनाली संतोष पवार हीने आसाम राज्यातील गुहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय भालाफेक स्पर्धत द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर पदक मिळविले.
राजस्थान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धसाठी सोनाली पवार याची निवड झाली. तीच्या या यशाबद्ल प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, मुख्याध्यापक प्रविण गायकवाड, उपप्राचार्च डॉ. चंद्रकांत बिराजदार, सुधीर अंबर, प्रा. राजकुमार दलाल, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. रविंद्र गायकवाड, प्रा. करबसप्पा ब्याळे, डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. रविंद्र आळंगे आदींनी तीचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी डॉ. अरविंद बिराजदार, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. संजय गुरव, प्रा. मुकूंद धुळेकर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. दयानंद बिराजदार, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, प्रा. अंकुश टाकळे, प्रा. भूषण पाताळे, नाना बेंडकाळे आदींच्या उपस्थितीत सोनालीचा विशेष सत्कार करण्यात आला.
पवार यास क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भिलसिंग जाधव , प्रा. नारायण सोलंकर, सुजित शेळके यांनी मार्गदर्शन केले.