तुळजापूर दि २० :
 महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याचे माध्यमांमधून समोर आल्यानंतर तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात धोरणाच्या अनुषंगाने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. मंदिर परिसरात मास्क वापर , सोशल डिस्टन्स न ठेवल्यास दंड आकारण्याची भूमिका प्रशासनाने जाहीर केली आहे.

तुळजापूर हे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून सोशल डिस्टन्स व मास्क न वापरता फिरणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यामध्ये सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात देखील गेल्या तीन दिवसात जे रुग्ण आढळले आहेत. मंदिर परिसरात देखील कोरोनामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, तहसीलदार सौदागर तांदळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता आगामी काळात कोरोना अनुषंगाने युद्धपातळीवर पूर्वीप्रमाणे खबरदारी घेण्याचे आदेश  दिलेले आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्स न ठेवल्यास दंड आकारणी केली जाणार आहे. व्यापारी भाविक भक्त पुजारी आणि शहरवासीय या सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे,  यासाठी नगरपरिषद , पोलीस , महसूल  व आरोग्य आदि प्रशासन यांना पूर्वीप्रमाणे सतर्क होण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

प्रशासनाचे मते कोरोना संसर्गाचा अंदाज घेऊन भाविक भक्तांनी दर्शनासाठी घराच्या बाहेर पडावे, या काळात योग्य ती खबरदारी आणि मास्क वापरणे बंधनकारक ठेवावे, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, सर्व खात्यांना सोबत घेऊन कोरोनाच्या संदर्भात तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर शहर परिसरात प्रशासन कडक धोरण अवलंबणार असल्याची माहिती तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली.

  बाहेरून येणाऱ्या भाविकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, त्याचबरोबर शहरवासीय व्यापारी आणि पुजारी बांधव यांनी देखील मास्क वापरणे, सामाजिक आंतर ठेवणे याची सवय लावून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये पत्रकारांनी पाहणी केली असता सोशल डिस्टन्स तुळजाभवानी मंदिरात पाळले जात नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. गर्दी आणि विना मास्क भाविकांची मोठी संख्या दिसून आली.
 
Top