तुळजापूर तालुक्यातील चिवरी परीसरात शुक्रवारी (दि.१९) पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे, रब्बी हंगामातील गहू हरभरा,ज्वारी यासह बागायत द्राक्ष, आंबा या फळपिकांना मोठा फटका बसला आहे.
या पावसामुळे रब्बी पिके जमिनीवर आडवी पडली असून गहू हरभरा ज्वारी आदी पिके भुईसपाट झाली आहेत. यावर्षी तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू हरभरा ,ज्वारी, पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.
शेतकऱ्यांसमोर सातत्याने पडणारा दुष्काळ, नापिकी मुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हैराण आहे. त्यातच आता अवकाळी पावसामुळे रब्बीच्या हातातोंडाशी आलेल्या रब्बीच्या पिकांवर पाणी फेरलयं पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतातील गहू ,ज्वारी, हरभरा ही पिके जमीनदोस्त झालेली आहेत. तसेच काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे . त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभे आहे. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुसकान भरपाई देण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत.