तुळजापूर, दि. २० :
तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने पंचायत समितीचे उपसभापती शिवाजीराव गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मात्र महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. दर्पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी मराठी पत्रकारितेला सुरुवात केली. अशा शब्दात उपसभापती शिवाजीराव गोरे बाळशास्त्री जांभेकर यांच्या कारकीर्दीचा गौरव केला. याप्रसंगी पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपसभापती गोरे यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.