वागदरी, दि.२१
शनिवारी  केरूर ता.  तुळजापूर येथे रिपाई व परिवर्तन संस्था, ज्ञानकिरण संस्थेसह  विविध  संघटनेच्यावतीने  कर्तृत्ववान महिलांचा गौरव करुन शुभेच्छा  देण्यात आले.
 
  तुळजापूर तालुक्यातील केरुर येथील भटक्या विमुक्त जाती पारधी समाज संघटनेच्या संस्थापिका सुनिता पंडीतराव भोसले याना आँल इंडिया ब्लु टायगर समाज संघटना मुंबईच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दि रियल पँथर पुरस्कार मिळाल्या बद्दल व येथील महिला कार्यकर्त्यां सोनाली महिपाल गायकवाड यांची बाभळगाव-केरूर ग्रुप ग्रामपंचयतीच्य सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल फेटा बांधुन,पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव  मारुती बनसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे,   राजेंद्र शिंदे, रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड आदी होते.

 प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन  मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त जाती पारधी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंडीत भोसले, संदिप गायकवाड, प्रदिप भोसले, शिवाजी कांबळे, दयानंद भोसले, लक्ष्मण गायकवाड, तुषार गायकवाड,  राजु गायकवाड, गयाबाई गायकवाड, सुमनबाई गायकवाड यासह महिला, युवा कार्यकर्ते  उपस्थित होते.
 
Top