धोत्री येथे भिमनगरमधील शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
काटी ,दि .२१ उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथे शुक्रवार रोजी सकाळी येथील शांतीदूत तरुण मंडळाच्या वतीने भिमनगरमध्ये अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले यांची 391वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी शांतीदूत तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्ता उबाळे , शिवनेरी तालिम मित्र मंडळाचे अध्यक्ष हिंदुश्री माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिस्ट पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी ,जय शिवाजी या जयघोषाने वातावरण शिवमय झाला होता.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्ता उबाळे, येथील शिवनेरी तालिम मित्र मंडळाचे अध्यक्ष हिंदुश्री स्वप्निल माने, गणेश गोडसे आदी मान्यवरांसह शांतीदूत तरुण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.