तुळजापूर, दि. २१ :
आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त  महिलांसाठी भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी कदम यांच्या वतीने १४२ गरजूंना साड्या व अन्नधान्य किट  वाटप  करण्यात आले.

भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर  पाटील , सोलापूर महानगरपालिका गट नेते अविनाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

  यावेळी जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, जि. प. सदस्य राजगुरू,  चिटणीस सुहास साळुंखे,   विकास मलबा, सागर पारडे, सागर कदम, तेजस सोमाजी, जिल्हा उपाध्यक्ष सौ. अंजली साबळे,  लता सोमाजी, रुपाली घाडगे , सारिका छत्रे, सुवर्णा उमाप, निकिता राऊत, अनिता चव्हाण, अक्षदा राऊत, अबोली सुरवसे ,अरुणा कावरे ,अर्चना साबळे, आदी महिला पदाधिकारी  उपस्थित होत्या.
 
Top