तुळजापूर, दि .२१ :
येथील देवीचे पुजारी अशोक जाधव यांच्या पत्नी सौ वनिता अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली ,पती ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर तुळजापुर घाटशीळ रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनिता अशोक जाधव या माजी नगरसेवक अमरिश जाधव यांच्या मातोश्री होत.
नगरपरिषदेच्या वतीने त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. तर जवाहर गल्ली परिसरातील दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला.