तुळजापूर,  दि. २१:
न.प.चे मुख्याधिका-यासह  सबंधितावर   गुन्हे दाखल करावेत यासह इतर मागण्याप्रकरणी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.आदोंलनाचा रविवार (दि.२१)रोजी पाचवा दिवस असुन या आंदोलनास विविध पक्षाकडुन पाठिंबा मिळत आहे.


 जसजसे आंदोलन तीव्र होत चालले तसे सामाजिक व राजकीय कार्य करणाऱ्या संघटना,पक्ष पदाधिकारी यांचे आंदोलनास पाठींबा मिळत आहे.
त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे  मिलिंद रोकडे व त्यांचे सहकारी, रिपब्लिकन सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल भाऊ शिंगाडे, सुरज वाघमारे , मनसेच्या वतीने डाँ.अफसर पठाण यांनी जाहीरपणे लेखी पाठिंबा  दिला आहे. 

यावेळी बालाजी गायकवाड, सारिका कांबळे, सुरेश शिंदे,डाँ.मारुती क्षिरसागर, अमोल सगट,लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग कदम,बापू कसबे, लहुजी सिरसट आदी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top