तुळजापूर,दि.२१:
तालुक्यातील आरळी( बु ) . सारख्या गावात क्रीडा अकादमी सुरू होत आहे. खरोखरच हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, मुलांना खेळण्यासाठी, क्रिडा प्रकारांचा सराव करण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत, स्पर्धेच्या युगात पालक मुलांकडून खूप अपेक्षा ठेऊन आहेत, पण मैदानावरील खेळ प्रकाराला दुर्लक्ष केले जात आहे. खेळामुळे मुले चपळ अन निरोगी राहतात, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाला प्राधान्य देण्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथिल शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा.अस्मिता कांबळे, तालुका क्रिडा अधिकारी सारिका काळे, न्यायाधीश संभाजी पारवे, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे,
कल्याण महाराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चित्तरंजन सरडे,मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण ननवरे, ॲड,रविंद्र कदम,प.स. सदस्य कविता कलसुरे, कल्याण महाराज शिंदे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे,योगेश थोरबोले, अनिल धोत्रे, गोविंद डोंगरे, अब्दुल सय्यद,अनिल शिंदें, महेश गवळी,सरपंच गोविंद पारवे, उपसरपंच किरण व्हरकट, माजी सरपंच ज्योतीताई पारवे,राम पारवे, विठ्ठल होगाडे,विक्रांत झुंजुरडे, राजेंद्र नागटिळक, भानुदास सुर्यवंशी, ॲड.महेश ढेकणे,दगडू लोखंडे, राम कदम,सुनील पारवे,ग्रामसेवक हमीद पठाण, प्रवीण कदम,अंकुश ननवरे, राजन शिंदे, उमेश शिंदे,यश चव्हाण आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास ज्योत,अनिल जाधव तर आभार महेश गवळी यांनी मानले.