अणदूर, दि.२७:  

जवाहर विद्यालय,अणदूर ता.तुळजापूर   येथे  शनिवारी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी प्रथमतः संत रविदास महाराज व कविवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  सामाजिक अंतर राखून विद्यार्थी व शिक्षकांच्या स्वरचित काव्य-वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यामध्ये कु.शैलेजा मोकाशे, अंजली घुगे,सानिका संगशेट्टी, आश्विनी जगताप,ऋतिका सोमवसे, श्रृती मोकाशे,  प्रदिप कदम,मकरंद पाटील,दत्ता राऊत,सिध्देश्वर मसुते यांनी काव्य मैफिल रंगवून टाकली. 

मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे ,उपमुख्याध्यापक विनोद कदम यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छापर विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन  केले..रविदास महाराज व वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनाचरित्राचे वाचन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप कदम यांनी केले .
 
Top