नळदुर्ग, दि. २७:
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी विभागाच्या आणि अक्षरवेल महिला साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्य धारा कवी संमेलन पार पडले.
सर्वप्रथम सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात आली व ग्रंथदिंडीचे आगमन महाविद्यालयात होताच ग्रंथ दिंडीचे पूजन प्राचार्य.डॉ. संजय कोरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कवि संमेलनाचं उदघाटन ज्येष्ठ कवी साहित्यिक समीक्षक माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर हे होते.
यावेळी व्यासपीठावर कवी वसुंधरा शर्मा, माधव गरड, विद्या भगरे भोसले, उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे, अक्षरवेलच्या अध्यक्षा सुप्रिया परळकर, कविता पुदाले, मराठी विभाग प्रमुख डॉ. दयानंद भोवाळ उपस्थित होते.
कवी माधव पवार यांनी आजच्या साहित्याविषयी बोलताना म्हणाले की कविता वाटते तेवढी सोपी नसते. कवितेला जन्माला घालत असताना अगोदर वेदना जन्माला यावी लागते तेव्हा खऱ्या अर्थाने कविता फुलू लागते. त्यानी अनेक बहारदार अशा कवितेचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करत असताना डॉ. संजय कोरेकर कविसंमेलनाला घेण्यामागचा हेतू व विद्यार्थ्यां प्रति असलेली रसिकता याविषयी आपले मत मांडत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर साहित्य समजून घेणे गरजेचे आहे यासाठी काही नाविन्यपूर्ण व महत्त्वपूर्ण कवी ना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसमोर आणणे गरजेचे वाटले.
यासाठी अक्षरवेलच्या सदस्या या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींची मदत मिळाली.
यावेळी वसुंधरा शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. या कविसंमेलनात वरील मान्यवरांसहीत डॉ. सुवर्णा गुंड चव्हाण, डॉ मल्लिनाथ बिराजदार, स्मिता ढोनसळे, आशाबी शेख, पंकज काटकर, निर्मला मोटे, अंजली सुरवसे, श्वेता परळकर, प्रा. एस. पी. कटारे, डॉ. तुळशीराम दबडे, कविता पुदाले, डॉ दयानंद भोवाळ, डॉ. सुभाष राठोड, प्रा. इंदुमती भोरे, डॉ.जयश्री घोडके, प्राची चिंचोले, ऋतिका सोमोसे, वैशाली गायकवाड, विद्या व्हनमाने आदी कवीने आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण केले.
या कविसंमेलनाचे प्रास्ताविक डॉ. एल. बी. थिट्टे व कविता पुदाले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. जयश्री घोडके यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन डॉ.संतोष पवार प्रा . झरीना पठाण व डॉ.सचिन देवद्वारे यांनी केले. तर आभार डॉ. सुभाष राठोड यांनी मानले. या कविसंमेलनासाठी पत्रकार शिवाजी नाईक, एस. के. गायकवाड, सचिन गायकवाड अक्षरवेलच्या सदस्या शैलजा भस्मे, छाया कदम, उमा जाधव, प्रतिभा पवार, निलावती गायकवाड आदींसह प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.