तुळजापूर,दि.27,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे मराठी भाषा गौरव दिना निमित्त कवि कुसुमाग्रज तसेच संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त प्रा.डॉ. वाय.ए.डोके व क्रीडाविभाग प्रमुख प्रा.डॉ.विलास गुंड पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठी विभागप्रमुख प्रा डॉ शिवाजीराव देशमुख यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तसेच संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.सोहन कांबळे,प्रा.अण्णासाहेब वसेकर, प्रा.डॉ.बालाजी गुंड, प्रा.विवेकानंद चव्हाण यांच्या सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे यथायोग्य पालन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.