नळदुर्ग , दि. ८:
नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) शहर शाखेच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आभिवादन करण्यात आले.
त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथे रिपाइं शहर शाखेच्या वतीने आभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन रिपाइंचे शहराध्यक्ष दत्ता बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यालयीन प्रमुख एस.जी.कुलकर्णी, आडत व्यापारी गयाज जहागीरदार, रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माहामाता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे एस.जी.कुलकर्णी म्हणाले की,महामाता रमाईच्या त्यागामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करू शकले आणि आज संविधानामुळेच प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वतंत्र मिळाले आहे.
यावेळी रिपाइंचे राजेंद्र शिंदे,भटक्या विमुक्त संघटनेचे संस्थापक पंडित भोसले, माजीद कुरेशी, पप्पू बनसोडे, अपिल बनसोडे, देवानंद लोंढे, बाळू भंडारे, लगन हलकंबे, सत्तार कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.