नळदुर्ग, दि. ८ : शहरातील धोकादायक विजेचे खांब हटविण्याबाबत वारंवार सांगुनही महावितरणने  दुर्लक्ष केल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत आपला रोष व्यक्त केला आहे.
 
काही महिन्यांपूर्वी महावितरणने नवीन विजेचे पोल उभे केले , परंतु जुने पोल जैसे थे ठेवल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे,असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वारंवार निदर्शनास आणून दिले होते,परंतु या विषयाकडे महावितरण चालढकल करत दुर्लक्ष करीत असल्याने सोमवार दि . ८ रोजी नळदुर्ग  महावितरणचे साहय्यक  आभियंता यांना "बेशरमाचे फाटे"देऊन निषेध व्यक्त  करण्यात आला.

  वाहतुकीस अडथळा ठरणारे जुने पोल तात्काळ हटविण्यात यावे या संदर्भात निवेदन देण्यात आले, यावेळी मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, आवेज इनामदार आदी उपस्थित होते.
 
Top