नळदुर्ग,दि.९. विलास येडगे
नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांची गरज लक्षात घेवून रुग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा करताना समाधान वाटत आहे. परंतु नगरपालिकेच्या माध्यमातुन ही सेवा नागरीकांना देण्याचे काम होणार आसल्याने पालिकेने या बाबत गांभीर्याने विचार करुन चांगली सेवा नागरीकांना देण्याचे काम करावे असे आवाहन करीत नळदुर्गचा चेहरा मोहरा बदलण्या बरोबरच अर्थकारण चांगले व्हायचे असेल तर औदयोगिक वसाहत होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांचे संहकार्य असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी येथे बोलताना केले.
तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या आमदार फंडातून नळदुर्ग शहरासाठी व परीसरातील ग्रामीण भागातील गावांसाठी पालिकेला सुसज्ज अशी रुग्णवाहीका दिली आहे, या रुग्णवाहीकेचा मंगळवार दि.९ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या प्रांगणात लोकार्पण सोहळा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहीकेची पुजा करुन करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, नेताजी पाटील, नगरसेवक नय्यर जहागिरदार, शहेबाज काझी, उदय जगदाळे, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, नगरसेवक निरंजन राठोड, महालिंग स्वामी, दयानंद बनसोडे, नगरसेविका सौ. छमाबाई राठोड, पंचायत समीती सदस्य सिध्देश्वर कोरे, भीवाजी अंगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. दिपक आलुरे, माजी जि. प.सदस्य गणेशराव सोनटक्के, नगरसेवक मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक संजय बताले, शरीफ शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठठल जाधव आदी उपस्थीत होते. प्रारंभी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या आमदार फंडातून दिलेल्या रुग्णवाहीकेची पूजा करुन रुग्णवाहीका लोकार्पण करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, रुग्णवाहीका लोकार्पण करताना मोठे समाधान वाटत आहे. कारण या रुग्णवाहीकेचा नागरीकांना आणि ग्रामस्थांना लाभ मिळणार आहे. मात्र यासाठी पालिका प्रशासनाने किंवा मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे आहे, यासाठी लागणारे चालक, त्याच बरोबर एखादा वैदयकीय अधिकारी हे पालिकेने देणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्याधिकारी व नगरसेवकांनी पुढाकार घेणे जरुरीचे आहे. त्याच बरोबर नळदुर्गवासियांसाठी अरोग्याची वरदायिनी ठरणारे उपजिल्हा रुग्णालय चालु होण्यासाठी सर्वच पातळीवरुन पक्षभेद विसरुन प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण या रुग्णालयासाठी अणखीन दहा ते पंधरा कोटी रुपयांची गरज आहे, पंरतु शासनाकडुन म्हणावा तसा निधी या रुग्णालयाच्या कामासाठी मिळत नाही म्हणून सर्वांनी यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. किल्ल्याच्या माध्यमातुन नळदुर्गला फार मोठी उपलब्धी आहे, त्यामुळे रोजगार वाढणाऱ्या योजनांवर भर देणे आवश्यक आहे असे सांगून नळदुर्गचा अर्थिक विकास आराखडा तयार करण्याचे काम चालु असुन नळदुर्गच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी रोजगार निर्मीती आवश्यक आहे. त्यासाठी पर्यटन वाढले पाहीजे, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. नळदुर्गचा चेहरा मोहरा बदलायचा असेल आणि सर्वसामान्यांचे अर्थकारण सुधारायचे असेल तर नळदुर्गला औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे, त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आसल्याचे ही यावेळी त्यांनी म्हटले.
यावेळी प्रास्ताविक नगरसेवक नय्यर जहागिरदार यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, नगरसेवक शहेबाज काझी, मुश्ताक कुरेशी, माजी नगरसेवक संजय बताले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आभार मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी मानले. या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठीत नागरीक मुकूंद नाईक, सुनिल बनसोडे,भाजपाचे शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमोचे शहर अध्यक्ष श्रमिक पोतदार, धिमाजी घुगे, उमेश नाईक आदीजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक नय्यर जहागिरदार यांनी तर कर्यक्रमाचे सूत्रसंचलन भीमाशंकर बताले यांनी केले. यावेळी आभार न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी मानले.