वागदरी ,दि.४ :
भटके विमुक्त व आदिवासी पारधी समाज संघटनेच्या माध्यमातून गेली २० वर्ष सतत संघर्षात्म क काम करणाऱ्या पारधी समाजातील क्रियाशील कार्यकर्त्य सुनिताताई भोसले यांना ऑल इंडिया ब्लु टायगर संघटनेच्या वतीने यंदाचा द रियल पॅन्थर राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.

बाभळगाव केरुर ता.तुळजापूर येथील रहिवासी असून संपूर्ण महाराष्ट्रात  आदिवासी पारधी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरूद्ध सतत कार्य करीत असतात त्यांना मदतीचा हात देतात तसेच गावातील सर्वच महिलांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देतात त्यांच्या या समाज कार्याची नोंद घेऊन ऑल इंडिया ब्लु टायगर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  विलास  रुपवते व राज्य अध्यक्ष  बाळराजे शेळके यांनी पुरस्कार जाहीर केला आहे. 

सदर पुरस्काराचे वितरण दि.९ फेब्रुवारी रोजी माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हसते देण्यात येणार आहे.

 पंडित भोसले , एस. के.गायकवाड ,बाबासाहेब बनसोडे .राजेंद्र शिंदे ,आर. एस. गायकवाड ,मारुती बनसोडे , भैरवनाथ कानडे  यांनी सुनिता  भोसले यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top