नळदुर्ग ,दि.४
परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव  मारुती बनसोडे यांना द रियल पँथर राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

मारुती बनसोडे यांनी गेली ३० वर्ष सामाजिक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनिय काम केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत १० वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.आज पर्यन्त १५२ पोतराजांचे मतपरिवर्तन करुन त्यांचे केस कापून मुख्यप्रवाहात आणले आहे. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला संघटन, बचतगट बांधणी ,प्रशिक्षण इत्यादि माध्यमातून जनजागृती , प्रचार केला आहे. शेतकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून हि काम केले आहे.पंचायतराज प्रशिक्षण ,पाणलोट प्रशिक्षण ,पाणी फाउंडेशन ,राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था हैद्राबादचा सर्टिफाइड मास्टर रिसोर्स पर्सन  म्हणून कार्यरत ,यशदा पुणे यांच्याकडून आमचं गाव , आमचा विकास चे राज्यस्तरीय प्रविण प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत 
वंचित घटकाला न्याय देण्यासाठी, समाजातील उपेक्षितासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून  कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 

 
Top