राजुरी : शाहरुख सय्यद
उस्मानाबाद तालुक्यातील चिखली चौकात ग्रामदैवत श्री शिवगुरू महाराज कमान उभारणीचा शुभारंभ जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आला़ गुरूवारी (दि़१८) सकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला़
उस्मानाबाद तालुक्यातील चिखली चौकामध्ये ग्रामदैवत श्री शिवगुरू महाराज यांच्या नावाने भव्य-दिव्य स्वागत कमान उभारण्यात येत आहे़ चिखली, राजुरी व पंचक्राशीतील शिवभक्तांनी लोकवर्गणी करून ही स्वागत कमान उभारण्याचा संकल्प केला आहे़ गुरूवारी या कामाचे भूमिपूजन पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री़ रणदिवे यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले़ यावेळी पंचायत समिती सदस्य प्रदीप शिंदे, चिखलीचे सरपंच जाधवर, ग्रामपंचायत सदस्य मार्तंड भोजने, तेजस सुरवसे, विनोद बाकले, शाहरुख सय्यद, युवा नेते गुरुनाथ गवळी, गणेश जाधव, बबलु जाधव, असिफ सय्यद, हनुमंत पोंदे, दत्ता खंडाळकर, संजय जोशी, समाधान मते, रवी सुरवसे, विवेक जाधव, रवी जाधव, मोहन मते, दुषांत जोबे, प्रभाकर चव्हाण, विशाल कोळपे, मोहन मते, अनिकेत जाधव आदींसह भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते़ याठिकाणी अत्यंत देखणी स्वागत कमान उभारण्यात येणार आहे़ या कमानीवर भगवे ध्वजासह श्री शिवगुरू महाराज यांची प्रतिमाही साकारण्यात येणार आहे़ चिखली गावासह रस्त्यावर एकही स्वागत कमान नसल्याने याठिकाणी कमान उभारण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे़.