चिवरी, दि.३
 बालाघाटच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर सुरक्षितता उपाय म्हणून रद्द करण्यात आली आहे, 


अनेक वर्षांची परंपरा असलेली यात्रा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असून ही  यात्रा रद्द झाल्याने स्थानिकातून व व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.


सोलापूर हैदराबाद महामार्गावरील अणदुर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध महालक्ष्मी देवीचे मंदिर असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश तेलंगणा , कर्नाटक, आदी राज्यातील लाखो भाविक, देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात, येथे वर्षभर मंगळवार ,शुक्रवार अमावस्या, पौर्णिमेला  भाविक  गर्दी करतात. दरवर्षी दोन दिवस यात्रा भरते, यंदा मात्र  करोना पार्श्वभूमीवर, यात्रा भरली नसून भाविकांनी मंदिराकडे येऊ नये असे आवाहन प्रशासनाने बैठक घेऊन केले होते.

 त्यानुसार भाविकांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत मंदिराकडे जाणे टाळल्याने  मंदिर परिसरात मात्र शुकशुकाट  असल्याचे दिसुन आले.
 
Top