तुळजापूर, दि. २ :
तुळजापूरचे शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नागरिकांची हेळसांड होत असून उद्योजक प्रफुल्लकुमार शेटे यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र करण्यासाठी दि. 15 फेब्रुवारी रोजी विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर तसेच साक्षीदार आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी पंधरा दिवसानंतर येण्याचे सांगितले होते, दोन दिवसापूर्वी उद्योजक प्रफुल्लकुमार शेटे हे उपजिल्हा रुग्णालय येथे प्रमाणपत्र मागणीसाठी गेले असता त्यांना साक्षीदार आणि इतर आवश्यक व्यक्तींना समोर आणण्याचे सूचना करण्यात आली.
सदर साक्षीदार आणि इतर व्यक्ती बाहेरगावी असल्यामुळे त्यांना समोर आणणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी पंधरा दिवसापूर्वी अर्ज देताना आपण अशा प्रकारची सूचना करणे गरजेचे होते, साक्षीदार समोर आणण्याची सूचना अर्ज देताना आपण का केले नाही ? अशी विचारणा त्यांना केली. प्रशासनाच्या व कर्मचाऱ्यांच्या यात दिरंगाई करणार्यावर कार्यवाही बद्दल नाराजी व्यक्त करून यासंदर्भात सूचना फलकावर योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला तेव्हा मी कार्यालयात आल्यानंतर तुमचे काम करतो, अशा प्रकारचे उत्तर देण्यात आले. मात्र या प्रकरणाशी संबंधित उद्योजक प्रफुल्ल कुमार शेटे यांनी प्रशासनाकडून नागरिकांची होणारी हेळसांड कायमस्वरूपी दूर झाली पाहिजे . अशी भूमिका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करून आगामी काळात विवाह प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या नागरिकांची हेळसांड करू नये अशी सूचना केली आहे.