नळदुर्ग,दि.१४: एस.के.गायकवाड
 नळदुर्ग   शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू लागु केल्याने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशाची आमलबजावणी करत संचार बंदीचे काटेकोर पणे पालन करण्यात आले.

   
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यत लाँकडाऊन करण्याच्या विचराधिन असलेल्या ठाकरे सरकारने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" म्हणत राज्यातील ज्या त्या जिल्हा प्रशासनावर परिस्थिती नूसार निर्णय घेण्याचा आदेश दिला .त्या निर्णयाच्या आधिन राहून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवून रविवार दि.१४ मार्च  रोजी जिल्ह्यात जनता कर्फ्यूचा  आदेश दिला.जनतेनेही या आदेशाची आमलबजावणी करत नळदुर्ग शहरामध्ये  सकाळ पासून व्यापा-यानी सर्व व्यवहार  बंद ठेवले. 

रविवारी नळदुर्गचा  आठवडी बाजार भरतो, जवळपास ४० ते ४५ गावातील लोक याठिकाणी  आठवडी बाजारासाठी येतात त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून जसजसा वेळ जाईल तसतसे नळदुर्गची बाजारपेठ माणसाने गजबजून जाते. शिवाय सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पहाण्याकरिता पर्यटकांनी लावलेली हाजरी यामुळे नळदुर्ग शहर ,बसस्थानक ते किल्ला गेट  फुलून जाते. परंतु जनता संचार बंदीमुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. 

व्यापाऱ्याहीआपापले दुकाने बंद ठेवली होती. 
  परंतु ग्रामीण भागात मात्र जनता कर्फ्यूला आत्याल्प प्रतिसाद मिळाला.असला तरी  ज्वारी पिक काढणीचे व शेती मशागत कामाची वेळ असल्याने गाव तसं रोजच निर्मनुष्य होते. एकंदरीत जनता कर्फ्यूला नळदुर्ग व परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला.

 
 
Top